S M L

अब्दुला म्हणतात,1 रुपयांत पोटभर जेवू शकता !

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2013 07:30 PM IST

अब्दुला म्हणतात,1 रुपयांत पोटभर जेवू शकता !

abdulla26 जुलै : देशात गरिबीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद रंगलाय. दिल्लीत फक्त 5 रुपयात जेवण मिळतं असं वक्तव्य काँग्रेस नेते रशीद मसूद यांनी केलंय. देशात गरिबी कमी झाल्याचा अहवाल नुकताच नियोजन आयोगानं दिला होता. त्यानंतर मुंबईत फक्त 12 रुपयाला एकवेळचं जेवण मिळतं अशी मुक्ताफळं काँग्रेस खासदार आणि अभिनेते राज बब्बर यांनी उधळली.

आता त्यापाठोपाठ एक रुपयांत जेवण शक्य असल्याचं काँग्रेसचे खासदार आणि केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. जेवण 1 रूपयातही होतं आणि 100 रूपयातही होतं, फक्त तुम्हाला खायचं काय आहे हे ठरवता आलं पाहिजे. सरकार जनतेला दोन वेळच जेवण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे असंही अब्दुला यांनी म्हटलंय. मात्र विरोधकांनी काँग्रेस नेत्यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

मुंबईत 12 रूपयात पोटभर जेवण कसं मिळू शकत हे राज बब्बर यांनी दाखवूनट द्यावं असं आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं. मुंबईत चहा सुद्धा 12 रूपयात मिळत नाही. काँग्रेसचे नेते नेहमी गरिबांची थट्टा उडवतात अशी टीकाही रावते यांनी केली. तर यूपीए सरकारचे जे फूड स्टॉल आहे त्या स्टॉलवर सुद्धा 12 रूपयात जेवण मिळत नाही. असं विधान करणं अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया बीजेडीचे खासदार जय पांडा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2013 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close