S M L

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2013 06:28 PM IST

Image raj_thakare_on_hakka_bhang34_300x255.jpg26 जुलै : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दिल्ली कोर्टाने पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. राज ठाकरे यांच्यासह आमदार शिरीष पारकर यांच्याविरोधातही वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांनी एका सभेतून बिहारींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

राज यांच्या वक्तव्यामुळे बरीच टीका झाली होती. या प्रकरणी पाटणा येथील वकील प्रेमनाथ यांनी उत्तरप्रदेशमधील कोर्टात याचिका दाखल केली होती. राज यांच्या विनंतीनंतर ही याचिका दिल्ली कोर्टात वर्ग करण्यात आली होती. या अगोदरही दिल्ली कोर्टाने राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं आणि कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मात्र राज यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हजर राहण्यास असमर्थता दर्शवली होती. आता राज यांना सुरक्षा देण्यात आली असून कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तर शिरीष पारकर यांनी आजारी असल्याचं कारण देऊन टाळलं होतं. आता दिल्ली कोर्टाने पुन्हा एकदा दोघांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2013 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close