S M L

स्वतंत्र तेलंगणाचा मार्ग मोकळा

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2013 09:42 PM IST

स्वतंत्र तेलंगणाचा मार्ग मोकळा

telangana30 जुलै : गेली अनेक दशकं भिजत पडलेल्या स्वतंत्र तेलंगणाचा मार्ग मोकळा झालाय. तेलंगणासाठी दिवसभर राजधानी दिल्लीत वेगवान घडामोडी होत होत्या. संध्याकाळी यूपीएच्या समन्वय समितीची बैठक झाली. त्यात सर्वच मित्रपक्षांनी तेलंगणाच्या निर्मितीला एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. आणि त्यात तेलंगणाच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तेलंगणावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा करण्यात आली. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत त्याची अधिकृत पण औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

पुढचे दहा वर्ष स्वतंत्र तेलंगणा आणि सीमांध्राची हैदराबाद ही संयुक्त राजधानी असणार आहे. त्यानंतर सीमांध्राच्या वेगळ्या राजधानीचा विचार केला जाईल, असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं. प्रत्यक्षात गेल्या काही दशकापासून किंबहुना निजामाच्या राजवटीपासून सुरू असलेला वेगळ्या तेलंगणाचा लढा आज संपलाय. काँग्रेसच्या कार्यकारिणीने जेव्हा तेलंगणाचा मार्ग मोकळा केला, त्यावेळी तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

तेलंगणा राज्य निर्मितीची प्रक्रिया ही पुढची चार ते पाच महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे तेलंगणा हे आता देशातलं 29 वं राज्य असणार आहे. पण, पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. कुठल्याही प्रकारची राजकीय महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने हा निर्णय घेतला नाही असं काँग्रेसचे आंध्रप्रदेशचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी वेगळ्या तेलंगणानंतर तेलंगणा राष्ट्र समिती काँग्रेसमध्ये विलीन करण्याची हमी टीआरएसने दिल्याची माहितीही त्यांनी दिलीय. दरम्यान, आता वेगळ्या तेलंगणामुळं आंध्रप्रदेशामधील एकूण 23 जिल्ह्याचं विभाजन झालंय. त्यात दहा जिल्हे तेलंगणामध्ये असतील, तर उर्वरित 13 जिल्हे हे सीमांध्रामध्ये येतात त्यातले नऊ तटवर्ती आंध्रप्रदेशमध्ये आहेत तर उर्वरित चार जिल्हे हे रायलसीमा भागातले आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांची प्रतिक्रिया

"मला पक्षाचा निर्णय मान्य आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि पक्षानं आपला निर्णय घेतलाय. मी राजीनामा देणार नाहीयं. तेलंगणा निर्माण होण्यासाठी सात ते आठ महिने लागतील.

 

तेलंगणाचा मार्ग मोकळा

 • - सध्या आंध्र प्रदेशात 23 जिल्हे आहेत.
 • - तेलंगणामध्ये 10 जिल्हे आणि उर्वरित सीमांध्र भागात 13 जिल्हे येतात
 • - यात कोस्टल आंध्रचे 9 तर रायलसीमा भागातल्या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे

तेलंगणा आणि सीमांध्रमध्ये कोण-कोणते जिल्हे येतात ?

  • - तेलंगणामध्ये हैदराबाद, अदिलाबाद, खम्मम, करीमनगर, महबूबनगर, मेडक, नलगोंडा, निझामाबाद, रंगारेड्डी आणि वारंगल या जिल्ह्यांचा समावेश होतो.
  • - तर सीमांध्रमधल्या कोस्टल आंध्रात श्रीकाकुलम, विजीयानगरम, विजयवाडा, विशाखापट्टनम, ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी, क्रीष्णा, गुंटूर, प्रकाशम आणि नेल्लोर हे जिल्हे येतात.

- सीमांध्रमधल्या रायलसीमा भागात कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर आणि चित्तूर हे चार जिल्हे येतात

 • लोकसभेचं चित्र
 • - तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा येतील तर लोकसभेच्या 17 जागा
 • - तर सीमांध्रमध्ये विधानसभा 175 तर लोकसभा 25 जागा आहेत.

या दोन्ही राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे ?

 • - तेलंगणा हा नक्षल प्रभावित भाग आहे. तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो
 • - तर सीमांध्रमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव खूपच कमी आहे.
 • - तेलंगणा हा भाग बहुतांशी नापीक जमिनीचा आहे. तिथे वीजेचीही कमालीची कमतरता आहे.
 • - याउलट सीमांध्र भागा हा नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध आहे.
 • - तेलंगणामधलं हैदराबाद हे एकमेव मोठं आणि प्रगत शहर आहे.
 • - तर सीमांध्रमध्ये औद्योगिकदृष्ट्या सक्षम आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशी अनेक शहरं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2013 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close