S M L

कोकण रेल्वे झाली 11 वर्षांची

26 जानेवारी रत्नागिरीदिनेश केळुसकरकोकणातल्या द-या-डोंगरातून धावणा-या कोकण रेल्वेला अकरा वर्षं पूर्ण झाली. कोकणच्या प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत निसर्गाशी सामना करत सुरू असणारी ही रेल्वेसेवा कोकणावासियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. या वर्षी कोकण रेल्वेचा टर्नओव्हर 1000 कोटींच्यावर जाणार आहे.तब्बल 91 बोगदे आणि सुमारे 1100 लहानमोठे पूल पार करत धावणारी कोकण रेल्वे 11 वर्षांची झाली. या 11 वर्षात कोकण रेल्वेने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला. आता ही रेल्वे ब-यापैकी सुरक्षीत आहे. पण कोकणात रेल्वे येईल यावर सुरुवातीला कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं.बघता बघता कोकण रेल्वे वाढू लागली . सणासुदीच्या दिवसात चाकरमान्यांना आधार तर झालीच पण कोकणाचं अर्थकारणही कोकणकन्येनं बदललं.कोकण रेल्वेचे प्रवासी सांगतात, कोकण रेल्वेमुळे लोकांची भरपूर सोय झाली. जास्त करून गौरी-गणपती, होळीच्या सिझनमध्ये कोकणवासियांना फ़ार फ़ायदा होतो पूर्वी लोकं फ़ार रात्रीची एस.टी पकडून अगदी एस.टीच्या टपावर बसून यायचे.मालवाहू ट्रकची वाहतूक म्हणजे रो सर्वीस ही कोकण रेल्वेची स्वत:ची आयडिया. कोकण रेल्वेला खरं तर यातूनच फायदा होतोय. शिवाय विदेशी पर्यटकांना घेऊन येणारी डेक्क्न ओडीसी ही सुध्दा कोकण रेल्वेची शान आहे. कोकण रेल्वेसमोरची निसर्गाची आव्हाने अजूनही संपलेली नाहीत. तरीही पुढच्या वर्षी ही रेल्वे कर्जमुक्त होऊन भारतीय रेल्वेकडे हस्तांतरीत होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2009 08:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2009 08:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close