S M L

सरकारी कर्मचार्‍यांनी तेलंगणा सोडावे, चंद्रशेखर राव यांचा इशारा

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2013 03:31 PM IST

सरकारी कर्मचार्‍यांनी तेलंगणा सोडावे, चंद्रशेखर राव यांचा इशारा

03 ऑगस्ट : यूपीएने वेगळ्या तेलंगणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर आता आता तेलंगणातील नेते आक्रमक झालेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात काम करणार्‍या सीमांध्र आणि रायलसीमातल्या सरकारी नोकरदारांना इशारा दिलाय.

या सर्वांनी तेलंगणातून परत जावं असा फतवाच त्यांनी काढला आहे. यामुळे तेलंगणातल्या रहिवाशांना कामं मिळतील, असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे वेगळ्या तेलंगणाच्या विरोधात सीमांध्रमधल्या काँग्रेसच्या 7 खासदारांनी शुक्रवारी आपले राजीनामे दिले. त्यामुळे आता काँग्रेसची मात्र धावपळ उडालीय.

सीमांध्रचे काही नेते आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनीही राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. काँग्रेसचे आंध्रप्रदेश प्रभारी दिग्विजय सिंह यांनी पल्लम राजू आणि इतर मंत्र्यांची भेट घेतली. आणि त्यांच्या मतांचा विचार करण्यासाठी समिती स्थापण्यात आल्याचं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2013 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close