S M L

मुंबईतले रेल्वेमार्ग ठरतायत धोक्याचे

27 जानेवारी, मुंबई गोविंद तुपे70 लाख मुंबईकर मुंबईत नियमितपणे रेल्वेनं प्रवास करताहेत. पण लोकल रेल्वे प्रवासात अपघात झाला तर वेळेवर उपचार मिळत नाहीत. जागतिक दर्जाचं शहर म्हणून मिरवणार्‍या मुंबईची ही शोकांतिका आहे. रेल्वेच्या अशा बेजबाबदारपणे कुणाल गुप्तेला आपला पाय गमवावा लागला आहे. कुणालचं हे दु:ख त्याच्या आईला सहन झालं नाही. त्यातच तिचा अंत झाला. मुंबईत लोकलचा मार्ग धोक्याचा ठरत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्यानं मृतांच्या आकड्यांमध्येही वाढ होत आहे. सव्वीस वर्षाचा कुणाल गुप्ते, मुंबईतल्या खार भागात राहतो. 23 फेब्रुवारी 2008 चा दिवस... कुणालनं गोरेगाव रेल्वे स्टेशनवरून खार इथं जाण्यासाठी ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. पण प्लॅटफॉर्म पडलर कमी उंचीचा. ट्रेनच्या दरवाजात एक पाय आणि बाहेर एक पाय अशा गडबडीत कुणाल घसरला. प्लॅटफार्मवरून खाली पडला. तो थेट रुळावर. त्यात ट्रेन कधी चालू झाली नाही ते कळलं नाही चालू कुणालच्या ओरड्यानं इतर प्रवाशांनी साखळी खेचून गाडी थांबवली. " मी रुळावर तसाच पडून होतो. मला लगेज डब्यात टाकून आणण्यात आलं. तोपर्यंत माझं रक्त वाहत होतं, " कुणालच्या तोंडून तो प्रसंग ऐकताना अंगावर शाहरं आलं. ताबडतोब मेडिकल ट्रिटमेंट मिळू शकली नाही. त्यामुळे कुणालचा पाय मांडीतून कापावा लागला. या धक्क्यानं आजारी आई आणखी खचली.तिचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या खाजगी असो किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये त्वरित पोहचवले पाहिजे. असा मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे. त्यासाठी सातशे रूपयेही रेल्वे कडून दिले जातात. पण रेल्वे स्टेशन्सवर ऍम्ब्युलन्स नसते. त्यामुळं जखमींना हॉस्पिटलमध्ये न्यायला उशिर होतो. अपघात झाल्यामुळे रक्त वाहत असतं. त्यामुळे खाजगी रीक्षा किंवा टॅक्सिवाले हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करत नाहीत. मग कुणाल सारख्या तरुणाला पाय गमवावा लागतो.अपंग झाल्याचा शिक्का त्याच्या माथी बसतो. अजून किती धडधाकट मुंबईकर अपंग झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांना जाग येईल हे कळत नाहीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2009 11:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2009 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close