S M L

मुंबै बँकेत घोटाळा

27 जानेवारी, मुंबईआशिष जाधवमुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सव्वाशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीला आलंय. याबद्दलची महत्त्वाची कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीयत. सहकार खात्याच्या जॉइंट रजिस्ट्रारनी बँकेच्या 42 आजी माजी संचालकांना नोटीस बजावली आहे. या बँकेनं साखर कारखान्यांना कर्जाची खिरापत वाटलीये. विशेष म्हणजे नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाला तब्बल 121 कोटी रुपये कर्ज दिलं होतं. पण या कर्जाची वसुलीच झाली नाही. त्यामुळे हे कर्ज बुडित खात्यात जमा झालीये. याशिवाय एका इंडस्ट्रीयल सोसायटीशी केलेल्या व्यवहारातही गडबड आहे. चक्रायू इंडस्ट्रीयल सोसायटी चालवताना बँकेला 98 लाखांचा तोटा झालाय. बँकेच्या 9 वाहनांच्या लिलावातही सव्वापाच लाखांचं नुकसान झालंय. कुर्ला आणि गोराई इथं बँकेसाठी जास्त भावानं भूखंड घेतल्यामुळे त्यामध्ये 27 लाखांचा तोटा झालाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2009 12:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2009 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close