S M L

'सरकारी मदत नको, अगोदर पाकला उत्तर द्या'

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2013 05:56 PM IST

'सरकारी मदत नको, अगोदर पाकला उत्तर द्या'

vijay kumar07 ऑगस्ट : आम्हाला सरकारची मदत नकोय जर मदत करायची असेल तर अगोदर त्या पाकिस्तानला जशाच तसे उत्तर द्या, त्यांना धडा शिकवा अशी मागणी शहीद विजय कुमार यांच्या पत्नीने केलीय. पूंछमधल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना झाले आहेत. या हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद विजय कुमार यांच्या कुटुंबीयांनी सरकारने दिलेली मदत नाकारली आहे.

बिहार राज्य सरकारने विजय कुमार यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केलीय. सरकारनं आम्हाला मदत करण्यापेक्षा पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी अशा शब्दात विजयकुमार यांच्या पत्नीनं राज्य सरकारच्या अधिकार्‍यांना सुनावलंय. आज लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. त्यावेळी विजयकुमार यांच्या पत्नीने मागणी केली.

तर कोल्हापूरचे शहीद जवान कुंडलिक माने यांचं पार्थिव आज रात्री 9 च्या सुमारास पुणे विमानतळावर येईल आणि त्यांनंतर त्यांच्यामुळे गावी पिंपळगावला नेण्यात येईल. उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. माने वीस दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी येऊन गेले होते. शहीद माने यांची बातमी कळताच पिंपळगाववर शोककळा पसरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2013 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close