S M L

किश्तवार: जम्मू-काश्मीरच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 03:14 PM IST

किश्तवार: जम्मू-काश्मीरच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

kishtwar12 ऑगस्ट : किश्तवारमधल्या जातीय दंगलीप्रकरणी जम्मू आणि काश्मीरचे गृह राज्यमंत्री सज्जाद अहमद किचलू यांनी राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तो स्वीकारला असून राज्यपालांकडे पाठवण्यात आलाय. त्यापूर्वी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरच्या सरकारकडून अहवाल मागवला होता.

यासंबंधी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह यांनी सांगितलं की, परिस्थिती काबूत यावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. तसंच यासंबंधीचं फुटेज पाहून समाजकंटकांना अटक करण्याच्या सूचनाही राज्य सरकारला देण्यात आल्यात.

तर, राज्य सरकारने या दंगलींची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधल्या किश्तवार शहरात झालेल्या जातीय दंगलीनंतर जम्मू विभागातल्या आठपैकी तीन जिल्ह्यांमधली संचारबंदी हटवण्यात आलीय.

सकाळी दोडा आणि कथुआ या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी हटवण्यात आली. मात्र, तिथं कलम 144 अंतर्गत जमावबंदीचा आदेश देण्यात आलाय. त्यानंतर उधमपूरमधली संचारबंदीही हटवण्यात आली. उरलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये तणाव अजूनही कायम आहे. त्यामुळे सध्या किश्तवार, जम्मू, राजौरी, सांबा आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close