S M L

किश्तवार दंगलीत वरिष्ठ नेत्याचा हात-जेटली

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2013 02:51 PM IST

किश्तवार दंगलीत वरिष्ठ नेत्याचा हात-जेटली

arun jetely12 ऑगस्ट : किश्तवारच्या जातीय दंगली प्रकरणी आज राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी केंद्र आणि जम्मू आणि काश्मीर सरकारवर जोरदार टीका केली. किश्तवारमध्ये झालेल्या दंगलीमध्ये राज्य सरकारच्या वरिष्ठ नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केला.

तसंच दंगलींच्या वेळी पोलीस हे मूक साक्षीदार बनून राहिले होते असा आरोपही जेटली यांनी केला. राज्य सरकारनं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपनं केला.

तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली. तर जातीय दंगल झाल्याप्रकरणी माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी चिंता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close