S M L

अन्सारींनी केली सदस्यांची कानउघाडणी

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2013 11:14 PM IST

अन्सारींनी केली सदस्यांची कानउघाडणी

hamed ansari13 ऑगस्ट : राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाल्यानं अध्यक्ष हमीद अन्सारी संतापले आणि त्यांनी कडक शब्दांमध्ये सदस्यांची कानउघाडणी केली. या सभागृहात रोजच नियम आणि शिष्टाचारांचं उल्लंघन होत असल्याची टीका त्यांनी केली. सभासदांनी अराजकाची स्थिती निर्माण केली असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

यानंतर सभागृहाचं कामकाज थोडा वेळ तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर गंभीर झालेल्या सभासदांनी सभागृहाप्रती आदर व्यक्त केला. त्याचवेळी अध्यक्षांनी कठोर शब्दप्रयोग वापरले असून, ते त्यांनी मागं घ्यावेत अशी मागणीही सदस्यांनी केली.

काय म्हणाले हमीद अन्सारी?

"या सभागृहात प्रत्येक नियम, सभ्यतेचे प्रत्येक नियम मोडले जाताहेत. माननीय सभासदांना सभागृहाला अराजकाचं व्यासपीठ बनवायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे."

अन्सारींनी शब्द मागे घ्यावे- रविशंकर प्रसाद

"सर, आम्हाला हे सभागृह आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेविषयी अत्युच्च आदर आहे. आम्ही जनहिताचा एखादा मुद्दा उपस्थित करतो तेव्हा आम्ही अशा पद्धतीनं वागण्याची इच्छा राखत नाही. त्यामुळे शब्दच्छल करण्याऐवजी अध्यक्षांनी आपले शब्द मागे घ्यावेत. "

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2013 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close