S M L

हायकमांडचे आदेश मानणार -राणे

28 जानेवारी दिल्लीकाँग्रेसमधून निलंबित झालेले नारायणे राणे यांनी दिल्लीत अहमद पटेल तसंच ए.के. ऍन्टोनी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत काँग्रेसचे खा. कन्हैयालाल गिडवाणी होते. या भेटीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांच्या निलंबनाबाबत हायकमांड लवकरच निर्णय घेतील. माजी राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षीय बैठक होऊ शकली नाही त्यामुळे निर्णय लांबला गेला असं त्यांनी सांगितलं. राणेंनी सांगितलं, अजूनही ते काँग्रेसमध्ये आहेच. आणि पक्षात रहायचं असेल तर हायकमांड आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणं आवश्यक आहे. दरम्यान शरद पवार यांच्यासोबतची बैठक ही खाजगी कामासंबंधी होती असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्याला आता विसरलं पाहिजे असंही ते म्हणाले. मी राग विसरलो आहे पण लोभ कायम आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मजबूत करून जास्तीत जास्त जागा कशा मिळवता येतील यादृष्टीने काम करणार आहे. निलंबन रद्द करण्यासाठी मी कोणत्याही अटी ठेवलेल्या नाही तसंच हायकमांडनेही माझ्यावर कोणत्याचं अटी घातलेल्या नाही असंही ते म्हणाले. आपलं निलंबन रद्द करण्याबद्दल हायकमांड अनुकूल असल्याचं राणेंनी सांगितलं. मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी हायकमांडच्या निर्णयानंतरच विचार करेन. तसंच अजून काही वर्षे राज्यात काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2009 11:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2009 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close