S M L

आजचा दिवस टीकेचा नाही-अडवाणी

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2013 09:56 PM IST

आजचा दिवस टीकेचा नाही-अडवाणी

advani on modi15 ऑगस्ट : भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींनी आज पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले पण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मात्र काहीसा वेगळा सूर लावलाय.

देशात भल्लेही वेगवेगळे प्रांत असतील, राजकीय पक्ष असतील पण त्यांच्यामुळे लोकशाही मजबूत होते. सलोखा निर्माण होतो. पण आजचा दिवस हा स्वातंत्र्य दिवस आहे त्यामुळे भारतात अनेक शक्यता असल्या तरी आज टीका करण्याचा दिवस नाही असा जेष्ठांचा सल्ला मोदींचं नाव न घेता अडवाणींनी दिला.

तर शिवसेनेनंही अडवाणींच्या विधानाचं समर्थन केलं आहे. त्यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातला अनुभव निश्चित मोठा आहे. त्यांचा संघर्ष आणि त्याग मोठा आहे. त्यामुळे अडवाणींची भूमिका योग्य आहे. आजचा दिवस हा खरंच संयम राखण्याचा असतो. देशाच्या पंतप्रधानावर टीका करण्यासाठी 364 दिवस असतात पण एक दिवस हा स्वातंत्र्य दिनाचा असतो असं स्पष्ट मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

अडवाणींनी आज नवी दिल्लीत ध्वजवंदन केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी, देशातले सर्व मुख्यमंत्री आणि सर्व राजकारणी यांना शुभेच्छा दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2013 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close