S M L

शाजी मोहनचं नेटवर्क देशभरात

28 जानेवारी मुंबईअजित मांढरे सह निशाद शम्शी हेरॉइनच्या तस्करी प्रकरणात आयपीएस पोलीस अधिकारी शाजी मोहनचा काळा चेहरा समोर आला आहे. त्याचं नेटवर्क संपूर्ण देशात पसरलं आहे. शाजी मोहन त्याच्या पदाचा गैरवापर करत होता, असा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. त्याच्या या काळ्या धंद्यात अजून कितीजणांचा सहभाग आहे याचा शोध मुंबई पोलीस करत आहेत. शाजी मोहन 1993 बॅचचा आयपीएस ऑफिसर जम्मू काश्मीरमध्ये नार्कोटीक्स शाखेचा तो प्रमुख होता. पण सध्या हेरॉईन तस्कर प्रकरणात मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतात 9 राज्यात तो सूत्र हलवतो. त्याचे अनेक विदेशी क्लायंट आहेत. त्याच्या जवळ अफगाण हेरॉइन मिळाली. त्यावरूनच त्याचं नेटवर्क जागतिक पातळीवर असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. शाजी जम्मू काश्मीर मध्यल्या एका ड्रग डिलरच्या संपर्कात होता. पंजाब, शिमला आणि जम्मू काश्मीरच्या नार्कोटिक्स खात्यातील पोलीस अधिका-यांच्या संपर्कात शाजी होता. त्यामुळं ज्या पोलीस कर्मचा-यांनी शाजीला या धंद्यात मदत केली होती त्याचा तपास करण्याचं काम मुंबई एटीएसनं दिल्ली नार्कोटिक्स खात्याला दिली. नार्कोटिक्स खात्यात असताना शाजीनं अनेक ठिकाणी छापे टाकून हेरॉइन जप्त केली. पण, जप्त केलेल्या हेरॉईनचा काहीसा भागच तो प्रदर्शीत करायचा. बाकीची हेरॉइन तो आपल्या सहकार्यांच्या साह्यानं लपवायचा आणि विकायचा. नोव्हेबर 2007 मध्ये शाजीनं एका ठिकाणी छापा टाकून 52 किलो हेरॉइन जप्त केलेली. पण, त्यानं फक्त 8 किलो हेरॉइन पकडली असल्याचं दाखवलं होतं. शाजी आणि त्याचे साथीदार विक्की ओबेरॉय आणि राजेश कुमार ऑक्टोंबर 2008 मध्ये मुंबई आले होते. त्यामुळे शाजीच्या ग्राहक लिस्टमध्ये मोठी नावं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पोलीसही त्याच दिशेनं तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2009 02:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2009 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close