S M L

दाभोलकरांच्या खुनाचे राज्यसभेत पडसाद

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2013 10:49 PM IST

raja sbha22 ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे आज गुरूवारी राज्यसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी निषेध व्यक्त केला. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सनातन प्रभातसारख्या कट्टर हिंदूत्ववादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी केली.

अंधश्रद्धा विरोधात दाभोलकर यांनी 18 वर्ष लढा दिला. त्यांनी जादूटोणाविरोधी विधेयक तयारही केले. मात्र विधेयक मंजूर होण्याअगोदर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना अनेकवेळा हिंदूत्त्ववादी संघटनांनी धमकी दिली होती. त्यामुळे अशा हिंदूत्ववादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी दलवाईंनी केली.

दाभोलकर यांच्या हत्येला दोन दिवस उलटले तरी अजूनही मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय यावर राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. आज काँग्रेससह भाजपच्या खासदारांनी राज्यसभेत खुनाचा निषेध केला. यानंतर राज्यसभेत कोळसा खाण घोटाळा फाईल्स गहाळ प्रकरण, तेलगंणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातला त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2013 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close