S M L

शौर्य पुरस्कार वादाच्या भोवर्‍यात

29 जानेवारीशहिदांचा गौरव... मुंबई हल्ल्यात पराक्रम गाजवणार्‍यांचा सन्मान... यंदाची 26 जानेवारी फक्त पुरस्कारांनीच गाजली नाही. तर पुरस्कारांबाबतच्या वादानेही गाजली. या पुरस्कारांचं वाटप करताना शंभर टक्के पारदर्शकता पाळली गेली नाही असा आरोप होतोय. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शशांक शिंदेंना अशोकचक्र दिलं गेलं नाही. अरुण जाधव यांना फक्त गॅलेन्ट्री ऍवॉर्ड मिळालं. तर विश्वास नांगरे पाटील यांना काहीच नाही. या पुरस्कार वाटपांवरतीच आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट.मुंबई हल्ल्याचे फोटो दाखवून दाखवून जुने झाले. पण जुन्या झाल्या नाहीत त्या शौर्याच्या गाथा. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांचंही शौर्य असीम. आणि लढूनही जे जिवंत राहिले त्यांचाही पराक्रम अतुलनीयच. त्यांपैकीच एक म्हणजे बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय निधड्या छातीने ताजमध्ये घुसलेले विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटील यांच्या हातात होतं फक्त एक रिव्हॉल्वर आणि सोबत दोन कॉन्स्टेबल. तरीही ते अतिरेक्यांची पाठलाग करत ताजमध्ये शिरले आणि निधड्या छातीनं अतिरेक्यांशी लढले.पण पुरस्कार देणार्‍यांच्या लेखी त्यांच्या या पराक्रमाला काहीच किंमत नाही. ते शहीद झाले नाहीत म्हणून त्यांचं शौर्य कमी होत नाही.हीच कथा पोलीस नाईक अरुण जाधव यांची. 6 गोळ्या लागूनही अरुण जाधव कसाबच्या गाडीचा मार्ग पोलिसांना कळवत राहिले, त्यामुळेच कसाबला पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं पुढे सिद्धही झालं. पण अरुण जाधव यांना मिळालं फक्त गॅलेन्ट्री ऍवोर्ड. हे पुरस्कार देताना काय निकष लावले जातात असा सवाल सीएसटीवरच्या हल्ल्यात ठार झालेल्या इन्स्पेक्टर शशांक शिंदे यांच्या पत्नीनंही केला. "सरकार शौर्य पुरस्कार देताना काय निकष लावते, ते त्यांनी जाहीर करायला हवं. या पुरस्कारांच्या वितरणात पारदर्शकता हवी" असं मानसी शिंदे म्हणाल्या. शौर्य पुरस्कारांच्या वाटपातही लॉबिंग असतं, असा आरोप निवृत्त आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तरही ठरलेलं आहे. "आम्ही याबाबत चोकशी करू. माहिती घेऊ आणि मग पुढे काय करायचं ते ठरवू" असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.अतिरेक्यांच्या सुसाटत्या गोळ्यांचा सामना सरकारी बाबूंना कधीच करावा लागला नाही. मृत्यू चाटून जाणं म्हणजे काय हे त्यांना माहीत नसेल. म्हणूनच शौर्यपदकाची खिरापत वाटायची की काय, असा प्रश्न गृहखात्यातल्या या सरकारी बाबूंना पडला असेल. हा हल्ला एवढा मोठा होता की त्याने देश हादरला पण त्यातल्या लढवय्यांना गौरवताना मात्र कचेरीत बसलेल्या सरकारी बाबूंची मनोवृत्तीच दिसून आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 05:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 05:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close