S M L

राजकीय पुणे पॅटर्न धोक्यात

29 जानेवारी, पुणेसंपूर्ण राज्यात गाजलेला राजकीय पुणे पॅटर्न तुटण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादी , भाजप आणि सेना यांच्या आघाडीला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातमिळवणीनं धक्का दिला आहे. बुधवारी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांचे अर्थसंकल्प सादर करण्याचे अधिकारच काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी पुणे महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या इतिहासात स्थायी समितीच्या अध्यक्षांचे अधिकार काढून घेण्याची ही पहिल्ीाच घटना. अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्याचे सर्वाधिकार स्थायी समितीच्या अध्यक्षांना असतात. मात्र काँग्रेसने, हे अधिकार स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेनेचे श्याम देशपांडे यांच्याऐवजी सभागृह नेतेअनिल भोसले यांना देण्यात यावेत असा ठराव मांडला आणि बहुमताच्या जोरावर तो मंजूरही करण्यात आला. शिवसेनेने याला तीव्र विरोध केला. "अजित पवार यांनी पुणे पॅटर्न पाच वर्ष टिकवण्याचं जनतेला आश्वासन दिलं आहे. ते त्यांनी पाळायला हवं" अशी प्रतिक्रिया श्याम देशपांडे यांनी दिली. "आताच्या अंदाजपत्रकात समतोल विकासाला जागा नव्हती. म्हणून स्थायी समितीनं हा निर्णय घेतला" असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आबा बागूल यांनी सांगितलं.राष्ट्रवादी कौंग्रेसनं सर्व आक्षेप फेटाळले आहेत, तर भाजपनं याला पेल्यातलं वादळ ठरवलंय. "भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन हा प्रश्न सोडवतील" असं भाजप गटनेते विकास मठकरी म्हणाले.गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी कौंग्रेसने स्थानिक पातळीवरील इतर आघाड्या तोडाव्यात असं जाहीर आवाहन केलं होतं. एकूणच येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादी काँग्रेस नी ही खेळी खेळली आहे. नेते कबुल करत नसले तरी पुणे पॅटर्नचं अस्तित्व धोक्यात आल्याचे हे संकेत आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी सर्वतोपरी मदत करेल असं शरद पवारांनी जाहीर केलंय. कौंग्रेसतर्फे सुरेश कलमाडींनाच उमेदवारी मिळणार, हे जवळपास नक्की आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेत पुणे पॅटर्न ऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 05:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 05:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close