S M L

नराधमांना फासावर लटकवा - सुषमा स्वराज

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2013 04:52 PM IST

Image sushma_sawaraj_on_delhi_rape_300x255.jpg26 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या नराधमांना फासावर लटकवा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. अशा प्रकरणात गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

या प्रकरणी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलं. लवकरात लवकर निकाल लागेल यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं शिंदे यांनी निवेदनात आश्वासन दिलं.

तर सीपीआयचे खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी झारखंडमधल्या पोलीस कर्मचारी महिलेवर बलात्काराच्या घटनेकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. तर जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी आसाराम बापूंबद्दलही गृहमंत्र्यांनी बोलावं अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2013 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close