S M L

रुपया झाला छोटा, डॉलरच्या तुलनेत रुपया 68 घरात

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2013 03:21 PM IST

Image img_183022_rupeessdollor_240x180.jpg28 ऑगस्ट :  गेल्या अठरा वर्षात रुपयाची मोठी घसरण झालीय. डॉलरमागं रुपयानं तब्बल 68 ची पातळी गाठलीये. बाजार सुरू झाल्यानंतर रुपया आधी 67 आणि नंतर 68 पर्यंत खाली आला. मंगळवारी रूपयानं डॉलरच्या तुलनेत सहासष्टी गाठली होती. आतापर्यंतचा रुपयाचा हा सर्वात निचांक आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था बळकट होत असल्यानं डॉलरची मागणी वाढलीये. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात डॉलर्स काढून घेत आहेत. त्याशिवाय अन्न सुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे बाजारात अस्वस्थता आहे.

त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढलेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन भारतीय बाजाराला फटका बसतोय. शेअर बाजारातही मंदीचा प्रभाव आहे. सेन्सेक्स 17 हजार 738 वर सुरू झाला. मंगळवार पेक्षा तो 229नं कमी होता, तर निफ्टी 5 हजार 217 वर उघडला, हा वर्षभरातला निचांक आहे. दुसरीकडे सोन्याची झळाळी कायम राहिली. प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज 34 हजार 492 रुपयांवर गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close