S M L

बापूवर खून,जमीन घोटाळ्याचेही आरोप

Sachin Salve | Updated On: Aug 28, 2013 11:27 PM IST

बापूवर खून,जमीन घोटाळ्याचेही आरोप

asaram bapu28 ऑगस्ट : आसाराम बापू आणि त्याच्या ट्रस्टवर केवळ लैंगिक अत्याचाराचेच आरोप नाहीयेत,त्याशिवायही त्याच्यावर महिलांवरच्या अत्याचाराच -खुनाचे आणि अगदी जमीन घोटाळ्याचेही आरोप आहेत.

आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर केवळ विनयभंग, बलात्कार आणि खुनाचेच आरोप नाहीत.आसाराम बापू ट्रस्टवर जमीन घोटाळ्याचाही आरोप आहे. आसाराम बापूचा एकेकाळचा भक्त अशोक ठकोरानं याबाबत खुलासा केलाय. ठकोरा यांच्या म्हणण्यानुसार आसाराम बापूच्या मोटेरामधल्या मुख्य आश्रमापासून जवळ असलेली त्यांची जमीन आसारामच्या भक्तांना वापरायला दिली होती. पण ट्रस्टनं ही जमीनच हडप केल्याचा आरोप होतोय.

सूरतमध्येही गुजरात सरकारच्या मालकीच्या जमिनीवर आसाराम आश्रम उभा आहे. गुजरात सरकार तसंच अनिल व्यास यांच्या जमिनीवर आसाराम ट्रस्टनं अतिक्रमण केल्याचा आरोप आहे.

त्यांनी माझ्या लोकांना मारहाण केली. आणि तात्पुरतं कुंपण बांधलं. आम्ही कुंपण काढायला गेलो तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला अशंही अनिल व्यास यांनी सांगितलं.

गुजरात सरकारनं आश्रमाला ही जागा खाली करायला सांगितलंय. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. पण आसारामनं मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. जुलै 2008 मध्ये, 11 वर्षांचे दिपेश आणि अभिषेक आश्रमातून गायब झाले. दोन दिवसांनंतर या दोघांचे मृतदेह साबरमती नदीजवळ सापडले. आश्रमामधल्या काळ्या जादूच्या विधीसाठी या दोघांचाही बळी दिल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केलाय.

आयुर्वेदिक डॉक्टर असलेले अमृत प्रजापती हे 18 वर्ष आसाराम बापूंशी जोडले गेले होते. पण 2005 मध्ये आश्रमात अनेक चुकीच्या गोष्टी होत असल्याचा आरोप करत त्यांनी हे संबंध तोडले. गेली अनेक वर्ष असे आरोप होतायेत..पण काही काळापुरतेच...स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू या सगळ्या कायद्यांवर मात करत असल्याचं वारंवार सिद्ध होतंय. म्हणूनच तर राजकीय नेतेही त्याच्याविरोधात काहीही करू शकलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 11:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close