S M L

हा सोनिया आणि राहुल गांधींचा कट, बापूची आगपाखड

Sachin Salve | Updated On: Aug 29, 2013 04:47 PM IST

Image img_75842_nsk_1602_asaram_bapu_240x180.jpg29 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणी आपल्याविरोधात राजकीय कट रचला जात आहे आणि हा कट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून रचण्यात आला अशी आगपाखड आसाराम बापूने केली. गेल्या साडेचार वर्षांपासून धर्मांतर करणार्‍यांना यांचा पाठिंबा मिळत आलाय असा आरोपही बापूंनी केलाय.

तसंच आपण जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे, पण दगाफटका होण्याची भीती आहे. एखाद्यावेळेस जेवणातून विष देण्यात येईल अशी भीती बापूना वाटतेय त्यामुळे त्यांनी जेलमध्ये गेल्यावर अन्न-पाणी घेणार नसल्याचं सांगितलं. मात्र बापूच्या या 'वाणी'वर काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

बापू पळवाटा शोध आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. बापूंविरोधात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असून समन्सही देण्यात आलाय बापूला 30 ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2013 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close