S M L

अटक टाळण्यासाठी बापूची धडपड

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2013 05:41 PM IST

अटक टाळण्यासाठी बापूची धडपड

asaram bapu30 ऑगस्ट: लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक टाळण्यासाठी आसाराम बापूची धडपड सुरूच आहे. आसाराम यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे ते हजर राहू शकत नाहीत असं कारण दिलंय.

तसंच आसाराम यांची तब्बेतही बरी नसल्यामुळे मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी आसारामच्या मुलानं केलीय. बापू तपासकामात पूर्ण सहकार्य करतील असंही त्यांनी सांगितलंय.

बापूविरोधात जोधपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी बापूला समन्स बजावली. पण बापूंनी याला कोणतेही उत्तर दिले नाही.

बापूविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आलाय. त्यांना 30 ऑगस्ट म्हणजे आज पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आजही मुदत संपत आहे त्यामुळे बापूला कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बापूच्या समर्थकांची धावपळ सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2013 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close