S M L

पोलीस शौर्यपदकं सापडली वादाच्या भोव-यात

29 जानेवारी मुंबईयंदाची 26 जानेवारी फक्त पुरस्कारांनीच गाजली नाही. तर पुरस्कारांबाबतच्या वादानेही गाजली. या पुरस्कारांचं वाटप करताना शंभर टक्के पारदर्शकता पाळली गेली नाही असा आरोप आता होतोय. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या शशांक शिंदेंना अशोकचक्र दिलं गेलं नाही. अरुण जाधव यांना फक्त गॅलेन्ट्री ऍवॉर्ड मिळालं. तर विश्वास नांगरे पाटील यांना काहीच नाही. पाहुयात या पुरस्कार वाटपांचा 'आयबीएन-लोकमत'नं काढलेला एक्स रे.मुंबई हल्ल्याची चित्रं दाखवून दाखवून जुनी झाली. पण जुन्या झाल्या नाहीत त्या शौर्याच्या गाथा. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांचंही शौर्य असीम आणि लढूनही जे जिवंत राहिले त्यांचाही पराक्रम अतुलनीयच. त्यापैकीच एक बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय निधड्या छातीने ताजमध्ये घुसलेले विश्वास नांगरे पाटील. ताजमधल्या सीसीटीव्हीतल्या दृश्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या हातात फक्त एक रिव्हॉल्वर. सोबत दोन कॉन्स्टेबल तरीही ते अतिरेक्यांची पाठलाग करत ताजमध्ये शिरले.पण पुरस्कार देणा-यांच्या लेखी त्यांच्या या पराक्रमाला काहीच किंमत नाही. हीच कथा पोलीस नाईक अरुण जाधव यांची 6 गोळ्या लागूनही अरुण जाधव कसाबच्या गाडीचा मार्ग पोलिसांना कळवत राहिले, त्यामुळेच कसाबला पकडण्यात पोलिसांना यश आलं. आणि या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं पुढे सिद्धही झालं. पण अरुण जाधव यांना फक्त गॅलेन्ट्री ऍवोर्ड.हे पुरस्कार देताना काय निकष लावले जातात असा सवाल सीएसटीवरच्या हल्ल्यात ठार झालेल्या इन्स्पेक्टर शशांक शिंदे यांच्या पत्नीनंही केला आहे. पण या पुरस्कारातही लॉबिंग असतं असा आरोप खुद्द निवृत्त आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी केला आहे. मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांकडून सुसाट बंदूकीच्या फैरी झडत होत्या. अशा परिस्थितीत ग्रेनेड, बॉम्बची पर्वा न करता पोलीस मुंबईसाठी लढत होते. सुसाटत्या गोळ्या कधी सरकारी बाबूंच्या कानाखालून सणाणत गेल्या नसतील. मृत्यू चाटून जाणं म्हणजे काय हे त्यांना माहीत नसेल म्हणूनच शौर्यपदकाची खिरापत वाटायची की काय, असा प्रश्न गृहखात्यातल्या या सरकारी बाबूंना पडला असेल. हा हल्ला एवढा मोठा होता की त्याने देश हादरला पण त्यातल्या लढवय्यांना गौरवताना मात्र कचेरीत बसलेल्या सरकारी बाबूंची मनोवृत्तीच दिसून येतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2009 06:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2009 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close