S M L

आसाराम बापूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2013 06:07 PM IST

asram bapu02 सप्टेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वयंघोषित आसाराम बापूला जोधपूर कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज बापूची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपलीय. त्याला जोधपूर कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने हा निर्णय दिला. त्याची रवानगी जोधपूरमधल्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आलीय. तसंच तुरुंगवारी टाळण्यासाठी बापूने पुन्हा जामीन अर्ज दाखल केलाय.

त्यावर उद्या सकाळी सुनावणी होणार आहे. अटक टाळण्यासाठी या अगोदरही बापूने गुजरात कोर्टात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता. मात्र जोधपूर पोलिसांनी बापूच्याविरोधात भक्कम पुरावे हाती असल्याचा दावा केला असून लवकरच आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आसाराम बापूचं पौरुषत्त्व सिद्ध, तब्येतही ठणठणीत

दरम्यान, मी नपुसंक आहे, मी लैंगिक अत्याचार करूच शकत नाही असा दावा करणार्‍या आसाराम बापूची वैद्यकीय चाचणीतून पोलखोल झालीय. बापूचं पौरुषत्त्व सिद्ध झालं असून त्याची तब्येतही ठीक असल्याचं सर्टिफिकेटच हॉस्पिटलने दिलंय. शनिवारी मध्यरात्री अटक झाल्यानंतर रविवारी पोलिसांनी बापूला त्याच्या आश्रमात घटनास्थळी घेऊन गेले आणि तिथं त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान बापूने आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले.

एवढेच नाही तर मी नपुसंक आहे, लैगिंक अत्याचार करूच शकत नाही असंही त्याने पोलिसांना सांगितलं. बापूची ही वाणी ऐकून पोलीस ही चक्रावून गेले. जर बापू नपुसंकच म्हणत असेल तर पोटन्सी टेस्टच करण्याचा निर्णय घेतला. अखेर बापूच्या चमत्कारासारखाच त्यांचा दावाही खोटा ठरला. वैद्यकीय चाचणीत तो चौकशीसाठी फिट असल्याचं स्पष्ट झालंच, तसंच त्याची पोटन्सी टेस्टही घेण्यात आली त्यात त्याचं पौरुषत्व सिद्ध झालं असून आसाराम आजारी नसल्याचं सिद्ध नसल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसंच त्यांच्या मदतनीसांची दिवस अखेर चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय.या प्रकरणी आतापर्यंत फक्त आसारामलाच अटक करण्यात आलीये. मात्र, आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते, असं पोलिसांतर्फे सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2013 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close