S M L

राज्यपाल-राज ठाकरे भेट

30 जानेवारी, मुंबईराज ठाकरे यांना राज्यपालांनी, राजभवनात चर्चेसाठी बोलावलं होतं. मुंबई विद्यापिठात मनसेनं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज्यपालांनी राज ठाकरेंना चर्चेसाठी बोलवलं होतं.थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची राज ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करण्यात येतोय. तुषार गांधी यांनी,राज्यपालांचा निषेध केलाय. तसंच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही राज्यपालांनी राज ठाकरेंनी बलोवणं चुकीच असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी चर्चेचं निमंत्रण दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या या कृतीचा प्रसिद्ध समाजसेवक तुषार गांधी आणि कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी निषेध केला आहे."मुंबई विद्यापीठावरील हल्ल्याचा आणि राज ठाकरे-राज्यापाल भेटीचा काही संबंध नाही. राज्यातल्या सर्वच राजकीय नेत्यांची भेट घेण्याचा राज्यपालांचा प्रघात आहे. मात्र सर्वपक्षीय नेत्यांची त्यांनी भेट घेतली तेव्हा राज ठाकरे यांना वेळ नव्हता. म्हणून ही भेट आज घेण्यात आली" असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठात मराठी हा विषय ऑप्शनला ठेवल्याबद्दल मनविसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठीत घुसून हंगामा केला होता. या वेळी झालेल्या तोडफोडीत विद्यापीठीचं बरंच नुकसान झालं होतं. त्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना चर्चेचं जाहीर निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या कृतीचा निषेध करण्यात येत आहे. "गुंडगिरी करणार्‍याना सन्मानानं चर्चेसाठी बोलावून राज्यपालांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या पुजार्‍याच्या स्मृतीदिनी हिंसेचं समर्थन करणार्‍या नेत्याला चर्चेसाठी बोलावण्यानं चुकीचा संदेश दिला जात आहे." अशी प्रतिक्रिया कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांनी दिली आहे.खरं तर राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने त्यांनी कारभार करणे अपेक्षित आहे. मुंबई विद्यापीठावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी विद्यापीठाला भेट दिली होती. यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी कमिशनर किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी राज ठाकरे यांना चर्चेसाठी बोलावण्याच्या त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2009 05:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 05:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close