S M L

आसाराम बापूच्या जामिनावरचा निर्णय राखून

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 03:49 PM IST

asaram bapu04 सप्टेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपावरून अटकेत असलेल्या आसाराम बापूचा जामीन अर्जावरचा निर्णय जोधपूर कोर्टाने राखून ठेवलाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आसारामविरोधात भक्कम पुरावा आहे.

 

पोलिसांनी जोधपूरच्या डीसीपींना धमकी देणारं पत्र मिळालं असल्याचही कोर्टात सांगितलं. आसारामच्या वकिलानं मात्र पीडित मुलगी ही अल्पवयीन नसल्याचा दावा केलाय. आसारामला तब्येतीच्या कारणावरून जामिनावर सोडण्यात यावं अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती.

 

शुक्रवारी मध्यरात्री आसाराम बापूला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर 3 दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सोमवारी आसाराम बापूला कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने बापूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तुरुंगात रवानगी केली. तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी बापूने जामीन अर्ज दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close