S M L

लोकसभेतील कोंडी फुटली,विरोधक विचारणा जाब

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 04:49 PM IST

Image img_214362_sushmaonpm_240x180_300x255.jpg04 सप्टेंबर : कोळसा खाणवाटपाच्या गहाळ फाईल्सवरून निर्माण झालेली संसदेतली कोंडी अखेर फुटली आहे. याप्रकरणी सरकारला जाब विचारण्याची संधी विरोधकांना मिळालीय. लोकसभेत यावर सध्या चर्चा सुरू आहे. सरकारने याप्रकरणी अजून एफआयआर का दाखल केला नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. फाईल्स हरवल्या नाहीत, तर चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या दोन आठवड्यांपासून फाईल गहाळ प्रकरणावरून विरोधकांनी पंतप्रधानांना धारेवर धरलंय.

 

मंगळवारी कोळसा खाण वाटप प्रकरणी सरकार काहीही लपवत नसल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. सरकारनं सीबीआयला या प्रकरणात जवळपास एक लाखांपेक्षा जास्त फाईल्स दिल्या आहेत आणि यापुढेही सहकार्य करू असही पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. आजही याप्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला अखेरीस विरोधकांना सरकारला जाब विचारण्याची संधी देण्यात आलीय.

 

संसदेचं पावसाळी अधिवेशन संपायला अजून 3 दिवस बाकी आहेत. त्यातच विरोधकांचा गोंधळ आणि विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दुसरीकडे आर्थिक सुधारणांसाठी सरकारच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेलं पेन्शन बिल लोकसभेत मांडण्यात आलं. काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी त्यावर चर्चाही सुरु केली. पण समाजवादी पक्षाच्या खासदारांनी त्यात अडथळा आणला. अधिवेशन संपण्यासाठी दोनच दिवस उरले असताना महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी कालच पंतप्रधानांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. आजही त्यादृष्टीनं प्रयत्न सुरुच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close