S M L

आसाराम बापूला जामीन नाहीच, तुरूंगयात्रा कायम

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2013 07:58 PM IST

asaram bapu arrest_12304 सप्टेंबर : अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापूचा जामीन अर्ज जोधपूर न्यायालयानं फेटाळलाय. त्यामुळे आसाराम बापूला 15 सप्टेंबरपर्यंत जेलमध्येच रहावं लागणार आहे. जोधपूर इथल्या आश्रमात अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ केल्याचा आरोप आसाराम बापूवर असून त्याप्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे.

 

जोधपूरमधून आसारामला अटक करण्यात आली होती. 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर बापूला सोमवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली आणि जोधपूर येथील सेंट्रल जेलमध्ये रवानगी केली. मात्र आसाराम बापूला तुरुंगायात्रा सहन होईना. तुरूंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी बापूने जामीन अर्ज दाखल केला होता.

 

आसारामला तब्येतीच्या कारणावरून जामिनावर सोडण्यात यावं अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. तुरूंगात गेल्यानंतर बापूला वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं. बापूने कोठडीत झोपताना गोमूत्र शिंपडलं त्यानंतरच कोठडीत प्रवेश केला. तसंच बापूने कैद्यांचं जेवण घेण्यास नकार दिला. म्हणून बापूला दूध आणि फळं देण्यात आली. पण बापूला कैद्यासारखीच वागणूक दिली गेलीय असा दावा तुरूंग अधिकार्‍यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2013 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close