S M L

'आम आदमी'शी संबंधामुळे योगेंद्र यादवांना कारणे दाखवा नोटीस

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2013 04:25 PM IST

Image yogendra_yadaw_300x255.jpg05 सप्टेंबर: आम आदमी पार्टीशी निगडित असल्याचं कारण देत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं सेफोलॉजिस्ट योगेंद्र यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षाशी निगडित असल्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं त्यांची विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीमधून हटवण्यासाठी हालचाल सुरु केल्यात.

 

योगेंद्र यादव हे आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि बुधवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.यादव राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे हितसंबंध आड येत असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रायलानं म्हटलंय.

 

यादव यांनी मात्र आपल्याला सरकारच्या टायमिंगमुळे आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याची प्रतिक्रिया दिलीयं. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं बजावलेल्या नोटीशीला उत्तर देणार असल्याचंही योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केलंय. सरकारला हव्या त्या पद्धतीनं यूजीसीमधून बाहेर पडणं हा अधर्म असल्याचं मतही त्यांनी IBN लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. यादव हे यूजीसीमध्ये कार्यरत आहेत. मात्र, ते आम आदमी पार्टीचे सदस्य असल्यामुळे हितसंबंध आड येत असल्याचा मंत्रालयाचा आक्षेप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2013 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close