S M L

50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून भेट, वेतन भत्ता वाढणार

केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2017 09:51 PM IST

50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून भेट, वेतन भत्ता वाढणार

28 जून : सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयोगाच्या काही सुचना आणि शिफारशी मंजूर केल्याचं स्पष्ट केलं. तसंच एचआरए आणि इतर भत्त्यांमध्ये बदल करण्यासाठीही मंजुरी देण्यात आलीये.

सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर एचआरएमध्ये वाढ होणार आहे. या निर्णयामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 1 जुलै 2017 पासून या शिफारशी लागू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सातवे वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जेटलींनी टि्वट करून केंद्रीय वेतन आयोगाद्वारे केंद्र सरकारचे अधिकारी, कर्मचारी आणि पेंशनधारकांना वेतन आणि भत्त्यांमध्ये ऐतिहासिक वाढ केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या 47 लाख कर्मचारी आणि 52 लाख पेंशनधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 09:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close