S M L

'जीएसटी'चं काऊंटडाऊन सुरू, मध्यरात्रीच्या सोहळ्याची जय्यत तयारी

जीएसटीच्या लाँचिंग समारंभ संसदेत पार पडणार आहे. या समारंभाची जय्यत तयारी सध्या चालू आहे. हा समारंभ नेहरूंच्या 'ट्रायस्ट विथ डेस्टिनी' या प्रसिद्ध भाषणाच्या पार्श्वभूमीवर घेतला जाईल आणि याचं नाव 'ट्रायस्ट विथ डेस्टिनेशन टॅक्स' असेल.

Sonali Deshpande | Updated On: Jun 30, 2017 09:36 AM IST

'जीएसटी'चं काऊंटडाऊन सुरू, मध्यरात्रीच्या सोहळ्याची जय्यत तयारी

30 जून : आजपासून जीएसटी भारतभर लागू होणार आहे. पण त्याआधी जीएसटीच्या लाँचिंग समारंभ संसदेत पार पडणार आहे. या समारंभाची जय्यत तयारी सध्या चालू आहे. हा समारंभ नेहरूंच्या 'ट्रायस्ट विथ डेस्टिनी' या प्रसिद्ध भाषणाच्या पार्श्वभूमीवर घेतला जाईल आणि याचं नाव 'ट्रायस्ट विथ डेस्टिनेशन टॅक्स' असेल.

हा कार्यक्रम संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम  आज (30 जून ) मध्यरात्री आयेजित केलाय. हा कार्यक्रम 80 मिनिटं चालेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येण्याच्या आधी 10 मिनिटं जीएसटीवरची एक छोटीशी फिल्म दाखवली जाईल.

या कार्यक्रमाचं आमंत्रण संसदेच्या सदस्यांशिवाय 100 पब्लिक पर्सनॅलिटीजला दिलेलं आहे.राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,स्पीकर, माजी  प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि एच .डी. देवेगौडाही मंचावर उपस्थित असतील.रतन टाटा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सोली सोराबजी, के.के. वेणुगोपाल आणि हरीश साळवे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

तसंच बीजेपी अध्यक्ष अमित शाह, माजी अर्थ मंत्री यशवंत सिन्हा, आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन, विमल जालान आणि डी सुब्बारावदेखील कार्यक्रमास येणार आहेत.अजूनही बरेच दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदींची भाषणं जवळजवळ अर्धा तास चालतील.जीएसटी लॉँच केल्यानंतर दोन मिनिटांची एक फिल्मही

दाखवली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close