S M L

भारतीय सैन्याचे डोकलाम परिसरातल्या गावकऱ्यांना गाव खाली करण्याचे आदेश

डोकलामपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथनांगमधल्या जवळजवळ 100 गावकऱ्यांना गाव खाली करण्यास सांगण्यात आलंय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 10, 2017 12:46 PM IST

भारतीय सैन्याचे डोकलाम परिसरातल्या गावकऱ्यांना गाव खाली करण्याचे आदेश

डोकलाम, 10 आॅगस्ट : डोकलाममधला तणाव दिवसेंदिवस वाढतोय. भारतीय सैन्यानं डोकलाम परिसरातल्या गावकऱ्यांना, गाव खाली करण्याचे आदेश दिलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोकलामपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथनांगमधल्या जवळजवळ 100 गावकऱ्यांना  गाव खाली करण्यास सांगण्यात आलंय.

दरम्यान सुकनाकडून लष्कराची तुकडी डोकलामकडे रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. भारतीय सैन्याकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये गेले कित्येक दिवस तणावाचं वातावरण आहे. चीननं डोकलाममध्ये रस्ता तयार केला, भूताननं त्याला आक्षेप घेतलाय. तेव्हापासून भारत-चीन सैन्य आमनेसामने आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close