S M L

लहानग्यांना आणि वृद्धांना पासपोर्टमध्ये 10 टक्के सूट, पासपोर्ट हिंदीतही मिळणार !

यापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2017 09:30 PM IST

लहानग्यांना आणि वृद्धांना पासपोर्टमध्ये 10 टक्के सूट, पासपोर्ट हिंदीतही मिळणार !

23 जून : आतापर्यंत पासपोर्ट न काढलेल्यांसाठी खुशखबर असून पासपोर्ट फीमध्ये 10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट फीमध्ये कपात केल्याची घोषणा केली आहे.

पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज करत असताना आता 10 टक्के कमी फी भरावी लागणार आहे. मात्र ही कपात सर्वांसाठी नसून फक्त आठ वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांनाच याचा फायदा मिळणार आहे. इतरांना मात्र आधी होती तितकीच फी भरावी लागणार आहे.

तसंच सुषमा स्वराज यांनी अजून एक महत्वाची घोषणा केली असून यापुढे जारी करण्यात येणारे नवीन पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही उपलब्ध असणार आहेत. याआधी पासपोर्ट फक्त इंग्रजी भाषेतच मिळत होते. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close