S M L

जीएसटी लागू झाल्यावर औषधं महागणार

जीएसटी लागू झाल्यावर उपचार करणं महाग होऊ शकतं. कारण गरजेच्या औषधांच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 11:50 AM IST

जीएसटी लागू झाल्यावर औषधं महागणार

28 जून : काही दिवसातच भारतभर जीएसटी लागू होणार आहे. आता जीएसटी लागू झाल्यावर उपचार करणं महाग होऊ शकतं. कारण गरजेच्या औषधांच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत.

आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या औषधांवर 9 टक्के टॅक्स होता. आता जीएसटीमध्ये याच औषधांवर 12 टक्के टॅक्स लागणार आहे. नॅशनल फार्मा प्रायसिंग अॅथोरिटीने सुद्धा (N.P.P.A) या करवाढीला मान्यता दिलीय. तसंच दर दहा वर्षांनी बाकीच्या औषधांची किंमत 10 टक्क्यांनी वाढवायलाही एन. पी. पी. ए .ने मान्यता दिली आहे. सध्या या औषधांच्या मार्केट प्राईसवर एक्साईज ड्युटी आणि व्हॅटही लागू होता. जीएसटी लागू झाल्यावर ही एक्साईज ड्युटी आणि व्हॅट लागू होणार नाही.

गरजेच्या औषधांवरचा कर वाढला असला तरीही जीवनरक्षक औषधांवर मात्र फक्त 5 टक्के टॅक्स लागणार आहे. यात मलेरिया, डेंग्यू , एचआयव्ही -एड्स, मधुमेह या रोगांवरील औषधांचा समावेश होतो.

औषधांना 12 टक्क्यांची टॅक्स स्लॅब दिल्यामुळे औषधांचे होलसेलर आणि रिटेलर सरकारवर नाराज आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर फेडरेशनने ड्रग रेग्युलेटरची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close