S M L

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवरचं लोकार्पण

या धरणाचं भूमीपूजन 5 एप्रिल 1961ला भारताचॆ पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 17, 2017 11:32 AM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवरचं लोकार्पण

केवडिया, 17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सरदार सरोवरचं लोकार्पण झालंय. पंतप्रधान नेहरूंनी  तब्बल 56 वर्षांपूर्वी भूमीपूजन केलेल्या या प्रकल्पाचं आज लोकार्पण झालं आहे.

या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 10.30च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आलं.यावेळी नितीन गडकरीही उपस्थित होते.

सरदार सरोवर धरण हे जगातलं दुसरं सर्वाधिक लांबीच आणि खोलीचं धरण आहे. या धरणाचं  भूमीपूजन  5 एप्रिल 1961ला  भारताचॆ पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं

या कार्यक्रमानंतर डभोई या गावात मोदी यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर अमरेली इथंही जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी श्रमदान करण्याचीही शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close