S M L

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यामुळे सुखावलेल्या वाहनचालकांच्या खिश्याला पुन्हा कात्री बसणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 10:39 PM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं

31 मे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीये. पेट्रोल प्रतिलीटर 1 रुपये 23 पैसे तर डिझेल 0.89 पैशांनी महागलंय. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यामुळे सुखावलेल्या वाहनचालकांच्या खिश्याला पुन्हा कात्री बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये. 15 मे रोजी पेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांची कपात करण्यात आली होती. 15 दिवस उलटत नाही तेच आज पेट्रोलच्या दरात 1 रुपये 23 पैशांची वाढ केलीये. डिझेलमध्ये मात्र 0.89 पैशांची वाढ केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close