S M L

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांच्या पगारात वाढ

इतर बँकेच्या अधिकाऱ्यांपेक्षाही आरबीआयच्या अधिकाऱ्यांचे पगार तुलनेने फार कमी असल्याने, त्यांच्या पगारात ही वाढ करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2017 01:47 PM IST

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांच्या पगारात वाढ

03 एप्रिल :  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे.

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा बेसिक सॅलेरी 90 हजार प्रतिमहिन्यावरून थेट अटीच लाख झाला आहे. या वाढीनंतर पगार आणि सर्व भत्ते मिळून आता गव्हर्नर यांना 3 लाख 70 हजार एवढा पगार मिळेल.

ही पगारवाढ जानेवारी 2016 पासून लागू असणार आहे. त्यामुळे मागी सव्वा वर्षांपासूनची वाढ उर्जित पटेल यांना मिळणार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

दरम्यान, इतर बँकेच्या अधिकाऱ्यांपेक्षाही आरबीआयच्या अधिकाऱ्यांचे पगार तुलनेने फार कमी असल्याने, त्यांच्या पगारात ही वाढ करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close