S M L

अच्छे दिन दूरच,महागाईच्या दरात वाढ

आॅगस्ट महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे. महागाई दर अर्थात सीपीआई दर 3.36 ने वाढला आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2017 10:42 PM IST

अच्छे दिन दूरच,महागाईच्या दरात वाढ

12 सप्टेंबर : 'अच्छे दिन' येणार येणार म्हणून वाट पाहणाऱ्या सर्वसामान्याचे 'बुरे दिन' सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे. महागाई दर अर्थात सीपीआई दर 3.36 ने वाढला आहे. जुलै महिन्यात हाच दर 2.36 इतका होता.

महिने दर महिन्यांचा आधारावर आॅगस्टमध्ये महागाईचा दर 3.9 वाढून 4.5 टक्क्यांवर पोहोचलाय.

आॅगस्ट महिन्यात शहरी भागात महागाई दर 2.17 टक्क्यांवरून 3.35 टक्के वाढला आहे. तर याच दरम्यान ग्रामीण भागात महागाई दर 2.41 वरून 3.3 टक्के वाढला आहे.

याच दरम्यान भाज्यांचे भावही कडाडले. भाज्यांचा महागाई दर -3.57 वरून 6.16 वर पोहोचलाय. तर दाळींच्या बाबतीत महागाई दर 24.75 वरुन -24.43 टक्के राहिलाय.

खाद्य पदार्थांचा महागाई दर -0.36 वरून 1.52 टक्के वाढलाय. तिथेच इंधनाच्या दरात 4.86 वरून तो 4.94 इतका वाढलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close