S M L

राज्यपालांच्या निर्णयाविरूद्ध जाणार कोर्टात- तेजस्वी यादव

राजद हा सर्वात मोठा पक्ष असूनही नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी राजदच्या आधी बोलावल्याबद्दल कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Jul 27, 2017 12:26 PM IST

राज्यपालांच्या निर्णयाविरूद्ध जाणार कोर्टात- तेजस्वी यादव

पाटना, 27जुलै : राजद नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेसाठी राजद हा सर्वात मोठा पक्ष असूनही नितीश कुमारांना सत्ता स्थापनेसाठी राजदच्या आधी बोलावल्याबद्दल कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहार विधानसभेत राजद हा 80 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यपालांनी नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर दोन दिवसात विधानसभेत आपले बहुमत सिध्द करण्यास काल रात्री सांगितलं. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव यांनी बुधवारी रात्री उशीरा राज्यपालांची भेट घेतली.

तसंच नितीश कुमारांविरूद्ध राज्यव्यापी निषेध मोर्चे काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलय.'बहुमत सिद्ध करण्याच्यावेळी आम्ही आमचं संख्याबळ दाखवू' असंही तेजस्वी यादव यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close