S M L

हिजबुल मुजाहिद्दीनच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

काल रात्रीपासून ही चकमक सुरू होती. आज पहाटे या दहशतवद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 10:32 AM IST

हिजबुल मुजाहिद्दीनच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

12 जुलै : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.काल रात्रीपासून ही चकमक सुरू होती. आज पहाटे या दहशतवद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं.

ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल रात्री एका गावात सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना घेरलं होतं.तेव्हापासून मध्ये थांबत थांबत गोळीबार सुरू होता.

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यानंतर महगाम भागात संरक्षण दलाची शोधमोहीम सुरू होती. याच दरम्यान एका गावाला घेराव घालण्यात आला होता आणि त्यानंतर आज त्यांचा खात्मा करण्यात आला.

दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दहशतवाद्यांकडे असलेली एक सेल्फ लोडिंग रायफल सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close