S M L

360 पैकी 360 मार्कस मिळवणारा हा आहे जेईईचा 'बाहुबली'

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2017 09:55 PM IST

360 पैकी 360 मार्कस मिळवणारा हा आहे जेईईचा 'बाहुबली'

28 एप्रिल : कल्पित वीरवलचं यश मात्र दैदिप्यमान आहे. पट्ट्यानं जेईईच्या मुख्य परिक्षेत पैकीच्या पैकी मार्कस मिळवलेत म्हणजे 360 पैकी 360. असं यश मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरलाय. बरं हे यश मिळवण्यासाठी कल्पित उदयपूर सोडून ना कोटाला गेला ना हैदराबादला. आहे तेच क्लासेस करून, 17 तासाच्या अभ्यासानं त्याला हे यश मिळालंय.

जेईईत टॉपर आल्यामुळे कल्पित देशातल्या कोणत्याही आयआयटी, एनआयटी किंवा केंद्रीय टेक्निकल संस्थेत प्रवेश घेऊ शकतो. काही आयआटीसाठी मात्र जेईई अॅडव्हॉन्सची परिक्षा द्यायला लागतेय. कल्पितनं आता त्यावर लक्ष केंद्रीत केलंय. कल्पितनं आता मिळालेलं यश हा काही अपघात नाही.

कल्पितचा जन्म हा एका दलित कुटुंबात झाला. त्यानं जेईईची परिक्षाही त्याच वर्गातून दिली. पण तो सगळ्या कॅटेगरीत टॉपर ठरलाय. कल्पितचं यश ऐतिहासिक आहे. कारण तो सगळ्या परिस्थितीशी झगडत मोठ झालाय. म्हणूनच तो खराखुरा बाहुबली ठरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close