S M L

पोलीस भरतीत मुन्नाभाईंचा प्रताप ; परीक्षा दिली दुसऱ्यांनी, निवड झाली तिसऱ्यांचीच !

या पाच जणांनी चक्क पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक केलीये. या पाच जणातल्या दोघांनी पोलीस भरतीत डमी उभे करुन ठाणे पोलिसांत निवड करुन घेतली होती.

Sachin Salve | Updated On: May 19, 2017 06:55 PM IST

पोलीस भरतीत मुन्नाभाईंचा प्रताप ; परीक्षा दिली दुसऱ्यांनी, निवड झाली तिसऱ्यांचीच !

19 मे : दोन जणांनी दिली शारिरीक चाचणी परीक्षा, दोन जणांनी दिली लेखी परीक्षा आणि निवड झाली तिसऱ्यांचीच...डोक चक्रावून सोडणारी घटना पोलीस भरतीत समोर आलाय. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

औरंगाबादचे हे मुन्नाभाई... यातल्या दोघांनी ठाणे पोलिसांची शारिरीक चाचणी परीक्षा दिली. दुसऱ्या दोघांनी लेखी परीक्षा दिली. आणि नोकरीसाठी निवड झाली तिसऱ्यांचीच.... या पाच जणांनी चक्क पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक केलीये. या पाच जणातल्या दोघांनी पोलीस भरतीत डमी उभे करुन ठाणे पोलिसांत निवड करुन घेतली होती.

चिखलठाण्यातल्या या दोघांनी ठाणे पोलिसांच्या मैदानीसाठी दोन डमी शोधले. त्यांना प्रत्येकी अडीच लाख देण्यात आले. तर दुसऱ्या दोघांना लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी साडेचार लाख देण्यात आले.

लेखी परीक्षा देणारेही काही कमी नव्हते. त्यांनी मोबाईल डिव्हाईसच्या सहाय्याने परीक्षा दिली. ठाण्यात लेखी परीक्षा घेणाऱ्या पोलिसांना ते मोबाईल डिव्हाईस वापरत होते याचा पत्ताही नव्हता.

पोलिसांनी सहा जणांच्या या टोळीचा पर्दाफाश केला असून आणखी किती जण पोलीस दलात भरती झालेत याचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2017 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close