S M L

नितेश राणेंना अटक करा, जैन धर्मियांची मागणी

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2013 04:58 PM IST

नितेश राणेंना अटक करा, जैन धर्मियांची मागणी

Nitesh Rane06 सप्टेंबर : जैन आणि गुजराती भाषिकांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे हे आता नव्या वादात सापडलेत. नितेश राणे यांचं हे वक्तव्य म्हणजे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं असल्याचं सांगत जैन धर्मियांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेनं जैन धर्मियाचं पर्युषण पर्व सुरू असल्यानं या काळात मांस विक्रीवर बंदी घातलीये. त्याच बरोबर महापालिकेचे कत्तलखानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केलीय.

मुंबईमध्ये हे जे काही प्रकार वाढत चालले आहे. आणि मुंबईकरही त्याला होकार देत असल्यामुळे भविष्यात येणारं हे मोठं संकट आहे. ते कुणालाही दिसत नाही. त्यामुळे या गोष्टी रोखल्या पाहिजे यासाठी स्वाभिमान संघटना आपल्या पद्धतीने तयारी करत आहे आणि त्यांना चोख उत्तर दिलं जाईल असा इशारा राणे यांनी दिलाय.

 

 

ज्याला खायचं त्यांना खाऊ द्या, पालिकेनं नको तिथे खुंटा घालू नये-राज ठाकरे

या मागे काँग्रेसच राजकारण आहे. जैन धर्मियाचं पर्युषण पर्वच्या निमित्ताने आम्ही त्याला विरोध करायचा त्यानंतर वाद होणार आणि त्यातून गुजराती समाजाची मत आपल्या हातून जातायत का यासाठी हा सगळा खटाटोप आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसंच मुंबई महापालिकेनं नको तिथं आपला खुंटा घालू नये. ज्याना ती वस्तु खायची आहे त्याच्याशी पालिकेला काय घेणं देणं? आणि याविरोधात फतवे कसले काढताय तुम्ही असा खोचक टोलाही राज यांनी लगावला. दोन दिवसांपूर्वी ते नाशिकच्या दौर्‍यावर होते. तेव्हा त्यांनी ही टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2013 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close