S M L

हत्तींच्या पुनर्वसनावरून सिंधुदुर्गमध्ये वाद

30 जानेवारी, सिंधुदुर्गप्रभाकर धुरीजंगली हत्तींना जेरबंद करण्याच्या मोहिमेवरून ग्रामस्थ आणि सिंधुदुर्ग वनविभाग, यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. पकडलेले हत्ती पुन्हा नुकसान करतील म्हणून या हत्तींना तिलारी धरणक्षेत्राच्या परीसरात सोडायला ग्रामस्थ तीव्र विरोध करत आहेत. त्यामुळे वनविभागाला हे हत्ती कर्नाटकच्या हद्दीत सोडावे लागणार आहेत. परीणामी हत्तीग्रामचा संकल्प कागदावरच राहण्याची शक्यता आहे.हत्ती घेऊन येणारा ट्रक आपल्या गावाच्या दिशेने येतोय अस समजताच मांगेलीचे ग्रामस्थ आक्रमक झाले. कोणत्याही परिस्थितीत हत्तिला या भागात सोडू देणार नाही,असा पवित्रा इथल्या शेतक-यांनी घेतला. पकडलेले हत्ती या भागात सोडण्यात आले तर ते पुन्हा आपल्याला उध्वस्त करतील अशी भीती या ग्रामस्थांना वाटत आहे. "शासनाने अभयारण्य केले दोडामार्ग तालुक्यातल्या ब-याच लोकांना धोका आहे कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. सात आठ बळी हत्तींनी घेतलेले आहेत." असं जगन्नाथ करगुटकर या ग्रामस्थाने सांगितलं.मात्र हे हत्ती दांडेली अभयारण्याच्या दिशेने जातील आणि परत इथे फ़िरकणार नाहीत असा वनविभागाचा दावा आहे. "हे हत्ती पुन्हा या बाजूला येणारच नाहीत. आणि आले तरी त्यांना दूर ढकलण्यासाठी म्हणून दोन महिने आमचे प्रशिक्षित हत्ती इथे राहणार आहेत" असं सावंतवाडीचे उप वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी सांगितलं.पकडलेल्या हत्तीला शेवटी या कुंपणाबाहेर कर्नाटकच्या हद्दीत सोडण्यात आलं. मात्र ग्रामस्थांचा असा विरोध कायम राहिला तर या हत्तींना घेऊन हत्तीग्राम वसवण्याची सरकारची कल्पना कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2009 11:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close