S M L

मुंबईचा समुद्र 1 किमी.आत सरकला,अनेक प्रकल्प अडचणीत

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2013 04:53 PM IST

मुंबईचा समुद्र 1 किमी.आत सरकला,अनेक प्रकल्प अडचणीत

mumbai arbian sea07 सप्टेंबर :मुंबईला लाभलेला अथांग अरबी समुद्र आता मुंबापुरीत शिरकाव करत असल्याचं उघड झालंय. राज्याचा नवीन कोस्टल झोन प्लॅनसाठी सॅटेलाईटद्वारे इमेजेस काढण्यात आल्यात. याइमेजेसनुसार मुंबईचा समुद्र तब्बल 1 किलोमीटर आत सरकलाय. त्यामुळे नव्या हायटाईड लाईननुसार सीआरझेड (CRZ) ची परिभाषा बदलली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळासह अनेक प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सीआरझेड 2011 अध्यादेशानुसार प्रत्येक राज्य सरकारला दरवर्षी 31 डिसेंबरपर्यंत कोस्टल झोन प्लॅन केंद्राकडे जमा करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने यावर्षीच्या कोस्टल झोन प्लॅनसाठी केरळ आणि तामीळनाडू येथील काही खाजगी संस्थांमार्फत नव्याने सॅटेलाईट इमेज मागवल्यात. यामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये अरबी समुद्र हा मुंबईत 1 किलोमीटरपर्यंत आत सरकला आहे.

 

यामुळे नव्याने हायटाईड लाईन तयार होत आहे. त्यामुळे आधीचे प्रकल्प जे नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे 200 मीटरच्यामध्ये येत नव्हते आता हे सर्व प्रकल्प यामुळे अडचणीत येणार आहे. या नव्या इमेजेसमुळे अनेक प्रकल्पांच्या आधीच्या पर्यावरणाच्या परवानग्या रद्द होऊ शकतात. याचा सर्वात पहिला फटका हा नवी मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळाला बसण्याचा शक्यता आहे.

 

त्याचबरोबर न्हावाशेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक, JNPT ट्रक टर्मिनल आणि लॉजिस्टीक्स पार्कसह अनेक प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्य सचिवांची समिती दिल्लीवारी करणार आहे. यामुळे घाबरलेल्या राज्य सरकारने तातडीने बैठक घेतलीय. या बैठकीत जो एक कि.मी.पर्यंत समुद्र आत सरकलाय तो कृत्रिम पद्धतीने सरकलाय. समुद्र किनार्‍यावरचे बांध  नष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आधीची हायटाईड लाईन ही खास बाब म्हणून कायम ठेवा असा आग्रह धरणार आहे. जेणे करून आधीच्या ज्या प्रकल्पांना परवानग्या मिळाल्या आहेत त्या कायम राहतील. नाहीतर हे सर्व प्रकल्प रखडले जातील, किंमती प्रचंड वाढतील आणि वेळे आल्यास हे प्रकल्प रद्द ही होतील अशी भीती आता व्यक्त होत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close