S M L

नाशिक हायवेवर बसला भीषण अपघात,9 ठार

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2013 09:39 PM IST

नाशिक हायवेवर बसला भीषण अपघात,9 ठार

nashik accident07 सप्टेंबर :मुंबई-नाशिक हायवेवर लक्झरी बसला भीषण अपघातात 9 जण ठार झाले असून 35 जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

शिर्डी इथं दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी नीता ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईकडे निघाले होते. नाशिक येथील शहापूर इथं लाहे फाट्याजवळ एक दुचाकी स्वार अचानक समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना बस ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि बस दुभाजक तोडून बाजूच्या मार्गावर गेली त्याचवेळी नाशिककडे जाणारी एक इनोव्हो कार बसवर आदळली.

 

ही धडक इतकी भीषण होती की, इनोवा कार बसखाली चक्काचूर झाली. या अपघात एकूण 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. तर 35 जण जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

अपघातग्रस्त बस

nasik accident3

 

 

या अपघातात इनोवाचा चुराडा

 

nasik accident

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 09:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close