S M L

जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे?

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2013 10:36 PM IST

Image img_192582_jaitapursena_240x180.jpg07 सप्टेंबर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलनादरम्यान ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार विचार करत आहे, पण ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत त्यांचा प्राधान्याने विचार होईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.

 

आज जैतापूर प्रकल्पाबाबत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मुख्यमंत्री, उद्योग मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री उदय सामंत तसंच अणुऊर्जा आयोगाचे अधिकारी आणि ग्रामस्थांचा एक गट यांच्यादरम्यान ही बैठक झाली. एकूण 2 हजार 336 प्रकल्पग्रस्तांना पैसे वितरणाचं काम सुरू झालं असून 15 ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

 

या बैठकीनंतर, विकास प्रकल्पाचं राजकारण करू नका', असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलाय. विशेष म्हणजे अलीकडे माडबन समितीने प्रकल्पाविरोधात आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. यावेळी खुद्द नारायण राणे हजर होते. समितीच्या माघारीनंतर मात्र मच्छिमारांनी आपला विरोध कायम असून आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलं. पण यानिमित्ताने आंदोलनात सपेशल फूट पडल्याची चित्र निर्माण झाल्याय. त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढू नये यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2013 08:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close