S M L

फाशीच्या लायक दोषींचं 'इन्कम'तपासणं गरजेच:कोर्ट

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2013 10:16 PM IST

Image suprim_cort_on_cbi4_300x255.jpg10 सप्टेंबर : फाशी..या शिक्षेला घाबरणारा आरोपी, आणि एखाद्या खटल्यात फाशी व्हावी अशी मागणी करणार्‍या अनेक तक्रारदारांसाठी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण सल्लावजा निर्णय दिलाय. फाशीची शिक्षा देण्यापूर्वी दोषींची आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थितीचा विचार करण्याची गरज असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलंय.

 

तसंच दोषी सुधारण्याची शक्यता आहे का याचाही विचार केला जाईल, असं कोर्टाने म्हटलंय. पत्नी आणि मुलांची हत्या प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या खटल्यातील दोषी व्यक्तीची फाशीची शिक्षा सुुप्रीम कोर्टाने जन्मठेपेत बदलली आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे मत नोंदवलंय.

 

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींच्या शिक्षेची उद्यापासून सुनावणी होतेय. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आणि नव्या कायद्यातील तरतुदीनुसार आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी शक्यता आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण मत नोंदवल्यामुळे या खटल्यावर या निकालाचा परिणाम होणार का, याची चर्चा सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2013 10:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close