S M L

पीडित महिलांसाठी 'मनोधैर्य'योजना मंजूर

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2013 03:31 PM IST

पीडित महिलांसाठी 'मनोधैर्य'योजना मंजूर

Rape case211 सप्टेंबर : बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुर्देवी महिलांसाठी मनोधैर्य योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. या योजनेमुळे पीडित महिलांना प्रति महिला तीन लाख रुपये, अशी मदत या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. या योजनेसाठी 68 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. 2 ऑक्टोबर पासून ही योजना राज्यभरात लागू होणार आहे.

 

तसंच महिलांच्या पुनर्वसनासाठी मानसिक आणि आर्थिक आधार देण्यात येणार आहे. लैंगिक अत्याचारग्रस्त मुलींना उपचारांचा खर्च मिळणार आहे. बलात्कारासारख्या भीषण प्रकरणात पीडित महिलांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण होतात. पीडित महिलेला मानसिक धक्का सोसावा लागतो. अशा वेळी तिला वैद्यकीय, न्यायालयीन लढाई आणि समाजातून पाठबळ मिळण्याची गरज असते. या बाबींकरिताच राज्य सरकारने पीडित महिलेला आर्थिक मदत व्हावी यासाठी बालकल्याण विभागाने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तयार केला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली.

मनोधैर्य योजनेतील मुद्दे

- लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना 3 लाख रुपयेही मिळणार

- वैद्यकीय आणि कायदेशीर मदत आणि समुपदेशन 3 लाखातच समाविष्ट

- ऍसिड हल्ला झालेल्या महिलांनाही योजनेमार्फत मदत

- जिल्हा स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक समिती स्थापन करणार,ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील.

- वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत आणि समुपदेशन या साठीच्या तातडीच्या मदतीचा समावेश या एकूण 3 लाखातच समाविष्ट आहे. आणि जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीला घटनेच गांभिर्य पाहून एखाद्या केसमध्ये 50 हजाराची अतिरीक्त मदत देता येईल.

- लैंगिक शोषित आणि ऍसिड हल्ल्याला बळी ठरलेल्या महिला आणि मुल यांना या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे.

- अँसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितेला 75% ऱक्कम पहिले मिळणार आणि 25 % रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करणार.

- लैंगिक शोषण झालेल्या महिला किंवा अल्पवयीन व्यक्तीला 25 % तातडीची मदत आणि 75% पीडित व्यक्तीच्या नावे फिक्स डिपॉझिट करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2013 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close