S M L

केंद्रीय पथक अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौर्‍यावर

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2013 12:19 PM IST

vidharbh rai ntoday11 सप्टेंबर : विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी केंद्रीय पथक विदर्भाच्या दौर्‍यावर येत आहे. गृह खात्याचे संयुक्त सचिव गोपाल रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे पथक नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांना भेटी देणार आहे. हा दौरा आज आणि उद्या होतोय.

 

अतिवृष्टी आणि पूर यामुळे विदर्भातल्या शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान झालंय. तसंच  शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याच्या घटनांमध्येही वाढ झालीये. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा हा दौरा महत्त्वाचा ठरतोय.

 

दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात केंद्राकडे वाढीव मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून अतिवृष्टी या व्याख्ये संदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. यासंदर्भातील निर्णय लवकरच होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चव्हाण बोलत होते. राहुल गांधी लवकरच विदर्भाचा दौरा करणार असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी ते येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2013 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close